Ajit Pawar Lashed Out At The MlC – Ajit Pawar: करोना पॉझिटिव्हचं निगेटिव्ह दाखवलं; अजित पवार ‘त्या’ आमदारावर भडकले | Maharashtra Times

[ad_1]

हायलाइट्स:

  • करोना पॉझिटिव्ह असताना निगेटिव्ह अहवाल आणला.
  • विधानपरिषद सदस्यावर अजित पवार भडकले.
  • सदस्यत्व रद्द करण्याची सभापतींकडे केली मागणी.

मुंबई: राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून करोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच सदस्याला कामकाजात सहभागी होण्याची अनुमती आहे. असे असताना करोना पॉझिटिव्ह असलेल्या एका विधानपरिषद सदस्याने निगेटिव्ह असल्याचा अहवाल दाखवला व हा सदस्य कामकाजात सहभागी झाल्याचं प्रकरण गंभीर बनलं आहे. या प्रकारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच भडकले आणि त्यांनी या सदस्याचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी सभापतींकडे केली. ( Ajit Pawar On MLC Coronavirus Test Latest News )

वाचा: ‘या’ सबजेलमध्ये एकाचवेळी १३ कैद्यांना करोना; उचलले ‘हे’ पाऊल

करोनाचा पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह करून घेणारा आमदार मंगळवारपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकारावर आधीच गंभीर चर्चा झाली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यंनी आज हा मुद्दा विधान परिषदेत मांडला व तीव्र संताप व्यक्त केला. या आमदाराचा नामोल्लेख टाळत अजित पवार यांनी आपलं म्हणणं मांडलं. करोना पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह दाखवून एखादा सदस्य जर सभागृहात उपस्थित राहत असेल तर ही बाब गंभीर आहे. त्यासाठी अशा सदस्याचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांनी सभापतींकडे केली.

वाचा: कोरोना संसर्गाचा धोका; ‘या’ जिल्ह्यात आठवडी बाजार बंद

काय आहे नेमकं प्रकरण?

भाजपचे विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक हे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असतानाही सभागृहात आले आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परिचारक यांचा अहवाल पॉझिटिव्ह असताना तो निगेटिव्ह करून देण्यात आला असेल तर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी शिंदे यानी केली होती. त्यावर परिचारक यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. २८ फेब्रुवारी रोजी माझा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी मी पुन्हा चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला. एकदा नव्हे सलग तीन वेळा माझ्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतरच मी सभागृहात उपस्थित राहिलो. याबाबत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाही मी अवगत केले होते, असे परिचारक यांनी सांगितले. दुसरीकडे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मात्र ही बाब गांभीर्याने घेत याबाबत विधीमंडळ सचिवालयाने चौकशी करायला हवी, असे नमूद केले होते.

वाचा: मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण तापलं; सुप्रिया सुळेंचं लोकसभाध्यक्षांना पत्र

[ad_2]

Source link

Leave a Comment