Anna Hazare Praises Nilesh Lanke: राष्ट्रवादीच्या आमदारावर अण्णा हजारे खूश! म्हणाले… – anna hazare praises ncp mla nilesh lanke

[ad_1]

हायलाइट्स:

  • अण्णा हजारे यांनी केलं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं कौतुक
  • पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचा केला सत्कार
  • लंके यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचा खर्च करण्याची दाखवली तयारी

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी फारसे पटत नसले तरी स्थानिक आमदारांच्या कामावर मात्र हजारे खूश आहेत. पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे हजारे यांनी तोंडभरून कौतुक केले. एवढचे नव्हे तर ‘लंके यांच्या जीवनकार्यावर कोणी पुस्तक लिहिणार असेल, तर त्याचा सर्व खर्च आपण करू,’ असेही हजारे म्हणाले. (Anna Hazare Praises Nilesh Lanke)

वाचा: अधिवेशन संपताच फडणवीस, पाटील सरसंघचालकांच्या भेटीला, चर्चेला उधाण

आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त हजारे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी एकाने लंके यांना भेट देण्यासाठी पुस्तक आणले होते. ते हजारे यांच्या हस्ते लंके यांना देण्यात आले. हा धागा पकडून हजारे यांनी लंके यांच्या जीवनकार्यावर अधारित पुस्तकाचा विषय काढला हजारे म्हणाले, ‘आमदार लंके यांचे काम, विचार, त्यांचा सामाजिक व राजकीय दृष्टीकोन हा महत्वाचा आहे. त्यांच्या पक्षातील आमदारांच्या पाठीमागे आपण लागतो, मात्र, लंके यांच्या पाठिशी मी आहे. त्यांना अनेक वर्षांपासून मी जवळून पाहतो. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन त्यांनी सांभाळले आहे. समाजसेवेसाठी तहान-भूक विसरून वाहून घेतले आहे. स्वतःच्या जीवनाचा त्याग केला असून समाजसेवेसाठी झपाटून काम करीत आहेत. त्यांच्या या जीवनकार्यावर पुस्तक झाले पाहिजे. त्यांच्यावर असे पुस्तक लिहिण्यासाठी कोणी पुढे येणार असेल तर स्वागतच आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च मी स्वत: करीन. पारनेर तालुक्याला असा आमदार पूर्वीच मिळायला हवा होता. लंके यांच्याप्रमाणे राज्यातील इतर आमदारांनीही कामे केले पाहिजे,’ असेही हजारे म्हणाले.

वाचा: भाजपला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या माजी आमदाराला ‘हे’ बक्षीस

यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, बाबाजी तरटे, सुरेश पठारे, दादासाहेब पठारे, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, योगेश मापारी, संभाजी वाळूंज उपस्थित होते. शिवसनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले लंके प्रथमच पारनेरचे आमदार झाले आहेत. तेव्हापासून त्यांचा हजारे यांच्याशी चांगला संपर्क आहे. मुख्य म्हणजे या आधी सलग तीन वेळा पारनेरचे आमदार असलेला विजय औटी यांच्याशीही हजारे यांचे चांगले संबंध होते. एका निवडणुकीत तर हजारे यांना औटी यांना पाठिंब्याच पत्र दिले होते. पक्ष न पाहता केवळ उमेदवाराचे चारित्र्य व काम पाहून औटी यांना पाठिंबा दिल्याचे त्यावेळी हजारे यांच्याकडून सांगण्यात आले होते. नंतरच्या निवडणुकीत औटी यांचाच पराभव करून लंके विजयी झाले आहेत.

वीज बिल थकबाकी: अखेर राज्य सरकारनं ‘तो’ निर्णय घेतलाच!

[ad_2]

Source link

Leave a Comment