Chhattisgarh: दोन मुलांच्या बापाचे अल्पवयीन मुलीवर जडलं प्रेम, मध्यरात्री घरात घुसला अन्… – chhattisgarh married man set on fire a minor girl after she refused his advances in raipur

[ad_1]

हायलाइट्स:

  • दोन मुलांच्या बापाने अल्पवयीन मुलीला पेटवले
  • १६ वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेम
  • नकार देताच, त्याने घरात घुसून दिले पेटवून
  • छत्तीसगडमधील रायपूरमध्ये घडली घटना

रायपूर: छत्तीसगडमधील रायपूरमधील सेरीखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री उशिरा दोन मुलांच्या बापाने एका अल्पवयीन मुलीला जिवंत पेटवले. मुलीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत आरोपीही जखमी झाला. मात्र, तो घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर होरपळलेल्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. अल्पवयीन मुलगी ५० टक्के होरपळली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सेरीखडीमध्य १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. त्याच परिसरात आरोपीही राहतो. गेल्या चार महिन्यांपासून तो तिच्या मागावर आहे. ती जेथे जाते, तेथे तिचा पाठलाग करत होता. त्याचे तिच्यावर प्रेम जडले होते. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र, पीडितेने त्याला नकार दिला.

मध्यरात्रीची वेळ, नाकाबंदी सुरू होती; २ दुचाकी सुस्साट येत होत्या, त्याचवेळी…

पीडितेच्या वडिलांनीही आरोपीची समजूत काढली होती. तरीही तो ऐकत नव्हता. अखेर पीडितेच्या वडिलांनी त्याला दम भरला. मुलीला त्रास देऊ नको असे बजावले. गेल्या काही दिवसांपासून आरोपी तिला फोन करून त्रास देत होता. बुधवारी मध्यरात्री आरोपी मुलीच्या घरात घुसला. अल्पवयीन मुलीचे आई-वडील आणि बहीण घरीच होते. तो मुलीच्या खोलीत गेला. तेथे दोघांमध्ये भांडण झाले. आरोपीने तिच्यावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले. याचदरम्यान, तोही होरपळला. त्याच अवस्थेत तो पसार झाला. मुलगी आरडाओरडा करत बाहेर पळत आली. तिचा आवाज ऐकून कुटुंबीय धावले. त्यांनी आग विझवली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. ती ५० टक्के भाजली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची हत्या करून मृतदेह पुरला

[ad_2]

Source link

Leave a Comment