Coronavirus in Maharashtra Latest News: Coronavirus In Maharashtra: राज्यात आज करोनाचे १४३१७ नवे रुग्ण; लॉकडाऊनची शक्यता बळावली – maharashtra reports 14317 new covid 19 cases 7193 discharges and 57 deaths in last 24 hours

[ad_1]

हायलाइट्स:

  • राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • १४ हजार ३१७ नवीन रुग्णांचे निदान तर ७ हजार १९३ रुग्ण झाले बरे.
  • राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येने ओलांडला १ लाखाचा टप्पा.

मुंबई: राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढत चालला असून गेल्या २४ तासांत तब्बल १४ हजार ३१७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर तीव्र चिंता व्यक्त केली असून नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊनला पर्याय उरणार नाही, असा इशारा स्पष्ट शब्दांत दिला आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest News )

वाचा: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर!; मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिला ‘हा’ इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून करोनाबाबत राज्यातील जनतेशी संवाद साधला असताना करोनाची आजची आकडेवारी हाती आली असून आजही मोठी रुग्णवाढ झाल्याचे दिसत आहे. बुधवारच्या तुलनेत आजचा दैनंदिन रुग्णांचा आकडा आणखी वाढला आहे. राज्यात आज तब्बल १४ हजारांवर नवीन बाधितांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या आणखी जवळ जात असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

वाचा: धारावी पॅटर्न चर्चेत आणणारे ACP नांगरे कालवश; २ दिवसांपूर्वी घेतली होती लस

राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या साथीच्या विळख्यात सापडून ५२ हजार ६६७ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २. ३२ टक्के एवढा आहे. आज राज्यात १४ हजार ३१७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ७ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २१ लाख ६ हजार ४०० करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.९४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७२ लाख १३ हजार ३१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ६६ हजार ३७४ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ८० हजार ८३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ७१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा लाखाच्यावर

राज्यातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाखांच्या वर गेली आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात १ लाख ६ हजार ७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात तब्बल २१ हजार २७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून नागपूर जिल्ह्यात हा आकडा १३ हजार ८०० इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यात १० हजार ८२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबई पालिका हद्दीतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडाही १० हजारांचा टप्पा ओलांडून आता १० हजार ५६३ इतका झाला आहे. नागपूर पालिका हद्दीत आज करोनाचे १ हजार ७०१ नवे रुग्ण आढळले. पुणे पालिका हद्दीत १ हजार ५१४ तर मुंबईत १ हजार ५०९ नवीन रुग्णांची भर पडली असून या तिन्ही प्रमुख शहरांत करोनाचा धोका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा: नागपुरात कडक लॉकडाऊन; पाहा नेमकं काय बंद राहणार?

[ad_2]

Source link

Leave a Comment