devendra fadnavis on mpsc exam: Devendra Fadnavis: ट्रॅक्टर मोर्चे कसे चालतात!; MPSC परीक्षा गोंधळावर फडणवीस बोलले – mpsc exam devendra fadnavis criticizes maharashtra government

[ad_1]

हायलाइट्स:

  • ट्रॅक्टर मोर्चे चालतात तर, परीक्षेसाठी करोनाचे कारण का?
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला सवाल
  • सरकारमध्ये पूर्णपणे विसंवाद असल्याचाही केला आरोप.

नागपूर: राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा विषय सरकारच्यावतीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळला जात आहे, असा आरोप करतानाच ट्रॅक्टर मोर्चे चालतात तर, परीक्षेसाठी करोनाकडे बोट का, असा खरमरीत सवालच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी नियोजित वेळेवरच ही परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. ( Devendra Fadnavis On MPSC Exam )

वाचा: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर!; मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिला ‘हा’ इशारा

विद्यार्थी अनेक वर्षे अभ्यास करतात आणि सरकार ५-६ वेळा परीक्षा पुढे ढकलते. खात्याकडून आयोगाला पत्र गेल्याचे मंत्र्यांना माहीत नाही. सरकारकडून कुणी बोलण्यास तयार नाही. १४ तारखेला परीक्षा असताना विद्यार्थ्यांना आज एसएमएस पाठवण्यात आले. सरकारमध्ये पूर्णपणे विसंवाद आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. सरकारची भूमिका चुकीची आहे. आंदोलने सुरू आहेत. सरकारी पक्षाचे मेळावे, ट्रॅक्टर मोर्चे चालले मग, परीक्षेसाठी करोना संसर्गाचे कारण का सांगता, असा सवालही त्यांनी केला. परीक्षेत आजुबाजूला कुणी बसत नाही. सामाजिक वावरचे पालन केले जाते. त्यामुळेच परीक्षा वेळेवर घ्याव्या, कोणत्याही स्थितीत पुढे ढकलू नये, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

वाचा: MPSC परीक्षा येत्या आठवडाभरात; तारीख उद्या जाहीर होणार: मुख्यमंत्री

दरम्यान, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळताच राज्यभरात ठिकठिकाणी परीक्षार्थी रस्त्यावर उतरले. राज्यातील अनेक शहरांत परीक्षार्थींनी तीव्र निदर्शने केली. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तातडीने संवाद साधला व सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोविडची स्थिती लक्षात घेऊन ही परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा निश्चितपणे येत्या आठवडाभरात होणार आहे. तशा सूचना मी संबंधितांना दिल्या आहेत आणि उद्याच परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वाचा: राज्यात आज करोनाचे १४ हजार ३१७ नवे रुग्ण; लॉकडाऊनची शक्यता बळावली

[ad_2]

Source link

Leave a Comment