lockdown in nagpur: नागपूरमध्ये कडक लॉकडाऊन; पाहा नेमकं काय बंद राहणार? – Coronavirus: Lockdown Imposed In Nagpur | Maharashtra Times

[ad_1]

नागपूर: झपाट्यानं वाढत असलेला करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागपूरमध्ये लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. १५ ते २१ मार्च असे सात दिवस हा लॉकडाऊन राहणार असून या काळात कडक संचारबंदी असेल. लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. हे लॉकडाऊन पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रापुरता मर्यादित असेल. (Nitin Raut Announces Lockdown In Nagpur)

वाचा: घाव वर्मी बसलाय; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. तसंच, लॉकडाऊन नेमका कसा असेल याबाबत माहिती दिली. बाधितांना विलगीकरणात ठेवण्यासाठी क्वारंटाइन सेंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे. आमदार निवासात त्यासाठी सुविधा करण्यात येणार आहे. डॉक्टरांसाठी वनामती येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात लसीकरण मोहीम सुरूच राहणार असून १३१ केंद्रांवर २ लाख लोकांना लस देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. विलगीकरणात असलेल्यांनी नियम पाळून घरातच राहावे यासाठी अधिकाऱ्यांकडून संबंधितांच्या घरी अचानक भेटी देण्यात येतील, असंही नितीन राऊत यांनी सांगितलं.

Nagpur

काय सुरू, काय बंद?

  • लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण शहरात कडक संचारबंदी
  • खासगी कार्यालये बंद राहणार.
  • शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती
  • मद्यविक्री बंद राहणार. मात्र ऑनलाइन विक्री सुरू राहणार आहे.
  • चष्म्याची दुकाने सुरू राहणार
  • मार्च एन्डिंगची कामे पूर्ण क्षमतेने सुरू राहणार

वाचा: राष्ट्रवादीच्या आमदारावर अण्णा हजारे खूश! म्हणाले…

[ad_2]

Source link

Leave a Comment