Mumbai Pune Expressway Accident – मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात विचित्र अपघात | Maharashtra Times

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी लोणावळा: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ एका कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकवर जाऊन जोरात आदळला. या अपघातामुळे लागलेल्या आगीत दोन्ही वाहनांना आग लागल्याने आगीमुळे ट्रकमधील ड्रम फुटल्याने भडकलेल्या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. हि घटना बुधवारी (आज) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

अपघात व आगीमुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने यादरम्यान मुंबई पुणे मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रक (क्रमांक-एमएच-४६/बीएफ-७७१३) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दोन्ही मार्गावरील संरक्षक कठडे तोडून विरुद्ध दिशेला मुंबई पुणे मार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरवर (एमएच-१२/एमव्ही-७००४) जोरात आदळला. या अपघातामुळे दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यामध्ये ट्रकमधील ड्रम गरम होऊन फुटल्याने त्यांचा स्फोट झाल्याने भडकलेल्या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? शिवसेनेनं केली ‘ही’ विनंती

अपघाताची माहिती मिळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग व खोपोली पोलिसासह देवदूत आपत्कालीन यंत्रणेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत. आग विझविण्यासाठी आयआरबी व खोपोली नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला प्राचारण करून चार तासांच्या प्रयत्नांनंतर पहाटे पाच वाजता आग आटोक्यात आणली. त्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली.

‘मुंबई पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात?’

[ad_2]

Source link

Leave a Comment