nana patole on ambani bomb scare: ‘अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून हे भाजपचे षडयंत्र’ – bjps conspiracy to get permission for helipad at ambanis house alleges nana patole

[ad_1]

हायलाइट्स:

  • अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणूनच हे षडयंत्र!
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला गंभीर आरोप.
  • इतकी सुरक्षा असूनही ती गाडी अंबानींच्या घरापर्यंत पोहचलीच कशी?

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ( Nana Patole On Ambani Bomb Scare Case )

वाचा: मनसुख हिरन यांच्या पत्नीचा आरोप; सचिन वाझे यांनी दिले ‘हे’ उत्तर

मुकेश अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकारची आणि त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी?, असा प्रश्न नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला.

वाचा: मुख्यमंत्र्यांना वाझेंचे वकील म्हणता मग विरोधी पक्ष जल्लाद आहे का?: शिवसेना

२००९ मध्ये अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता, याची आठवणही पटोले यांनी करून दिली. राज्यात व देशात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजप आमदारांनी या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला असेही पटोले म्हणाले.

वाचा: मनसुख हिरन यांच्या मृत्यूबाबत सचिन वाझे काय बोलणार?

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईत मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांसह एक स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यात संबंधित स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरन यांनी आत्महत्या केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने दोन्ही घटनांचा तपास एटीएसकडे दिला असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने यात एंट्री घेत स्फोटकांप्रकरणी तपास राष्टीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राज्य विधीमंडळात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्ष भाजपने सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. त्यावरूनच नाना पटोले आक्रमक झाले असून त्यांनी या विषयी बोलताना भाजपवर पलटवार केला आहे.

वाचा: महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का?; CM ठाकरे यांनी केले ‘हे’ मोठे विधान

[ad_2]

Source link

Leave a Comment