Rajesh Kshirsagar Appointed As Executive Chairman On State Planning Board – भाजपला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या माजी आमदाराला मिळाले ‘हे’ बक्षीस | Maharashtra Times

[ad_1]

हायलाइट्स:

  • राज्य नियोजन मंडळाची सरकारकडून फेररचना
  • कोल्हापुरात शिवसेनेचा किल्ला लढवणारे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना बक्षीस
  • क्षीरसागर यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती कायम

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे शासनाने पुनर्गठन केले आहे. या समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपला अतिशय आक्रमकपणे सतत आव्हान देत सेनेचा किल्ला लढविल्यामुळेच त्यांना हे बक्षीस मिळाले आहे.

वाचा: नाणार रिफायनरी प्रकल्प होणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळ वगळता सर्व समित्या शासनाने बरखास्त केल्या होत्या. परंतु, राज्य नियोजन मंडळ सुरूच ठेवले होते. या राज्य नियोजन मंडळाचे पुनर्गठन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीच्या “कार्यकारी अध्यक्ष” पदावर क्षीरसागर यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. यासह त्यांना या पदास “मंत्री दर्जा” देण्यात आला आहे. मंत्रालय समोरील प्रशासकीय इमारती मध्ये १८ व्या मजल्यावर या समितीस कार्यालय देण्यात आले आहे. या समितीमध्ये उपाध्यक्ष पदावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह समिती सदस्य म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह शासकीय अधिकारी काम पाहतील.

वीज बिल थकबाकी: अखेर राज्य सरकारनं ‘तो’ निर्णय घेतलाच!

क्षीरसागर हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती केली. त्यानंतर २००७ साली शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावर त्यांची निवड झाली. या कालावधीत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूरवासीयांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सन २००९ पहिल्यांदाच ते आमदार झाले. त्यानंतर पुन्हा २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत शिवसेना पश्चिम महाराष्ट्र पक्षप्रतोद म्हणून भूमिका बजावली आहे. अतिशय आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले क्षीरसागर हे भाजपला सतत आव्हान देत असतात. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आव्हान देण्यात ते सतत आघाडीवर असतात. त्यामुळेच त्यांना हे राज्य पातळीवरचे मोठे पद मिळाले आहे.

राज्य आणि जिल्हा पातळीवर पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना तयार करण्याचे काम या विभागाचे प्रमुख कार्य आहे. यासह मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत मानव विकासावर आधारीत योजना राबविणे याकरिता रु.४०० कोटी निधी वितरणाचे अधिकार पुढील काळात मिळणार आहेत. यामाध्यमातून राज्याचा विकास साधण्याचा प्रयत्न राहील.

राजेश क्षीरसागर

वाचा: लोकलमध्ये विनामास्क फिरणे मुंबईकरांना पडतेय महाग

[ad_2]

Source link

Leave a Comment