rapid antigen test: रॅपिड ॲन्टीजेन चाचणीचे अहवाल बनावट; ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द – recongition a total of 11 laboratories in amravati have been cancelled due to fake reports of rapid antigen test reports

[ad_1]

हायलाइट्स:

  • कोविडसाठी करण्यात येणाऱ्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट बनावट दिल्याने अमरावतीतील एकूण ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
  • अकोला, अमरावती तसेच वाशिम जिल्हात बोगस आरटीपीसीआर चाचण्यांसदर्भात कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत.
  • अमरावती जिल्ह्यात रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालात तपासणीमध्ये तफावत आढळून आली आहे.

मुंबई: कोविडसाठी करण्यात येणाऱ्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट बनावट दिल्याने अमरावतीतील एकूण ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.अकोला, अमरावती तसेच वाशिम जिल्हात बोगस आरटीपीसीआर चाचण्यांसदर्भात कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. तथापि, अमरावती जिल्ह्यात रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालात तपासणीमध्ये तफावत आढळून आली आहे. काही प्रयोगशाळा आयसीएमआरच्या पोर्टलवर वेळीच माहिती नोंदवत नसल्याचे आणि त्यांनी दिलेले काही रिपोर्ट हे बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (recongition a total of 11 laboratories in amravati have been cancelled)

कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर तसेच रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट या चाचण्या करण्यात येतात. या चाचण्यांपैकी आरटीपीसीआर ही गोल्ड स्टँडर्ड चाचणी मानण्यात येते. कारण या आरटीपीसीआर चाचणीने ६० ते ६५ टक्के अचूक निदान होते. तर रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट चाचणीद्वारे ३० ते ३५ टक्के इतके अचूक निदान होते, अशी माहिती टोपे यांनी विधान परिषदेत बोलताना दिली.

प्रयोशाळेतील इतर कोणत्याही चाचण्यांप्रमाणे या चाचण्यांसही काही मर्यादा आहेत. लक्षण विरहीत व्यक्तींमध्ये संसर्गाच्या प्रमाणात कमी कालावधीत वेगवेगळा निकाल दाखविण्याची शक्यता आहे. याशिवाय खालील कारणांमुळेही तफावत येऊ शकते. दोन वेगवेगळ्या कालावधीत घेण्यात आलेले नमुन्यांमध्ये (सॅम्पल) विषाणूंची संख्या अत्यल्प असल्याने चाचणीच्या निदानात तफावत येण्याची शक्यता असते, असे टोपे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- करोनाकाळात ‘ही’ देवस्थाने बंद; मार्ग काढत भाविकांची ‘या’ मंदिरात धाव

टोपे पुढे म्हणाले की, काही वेळा एखादा नमुना इतर कारणांमुळे देखील दूषित (contaminate) झाल्यास, निदानात नमुना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते.तपासणीसाठी नमुना (स्वैब) घेतल्यानंतर शीत साखळीचा अवलंब व्यवस्थितरीत्या न करता नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत गेला तर विपरीत निदान होण्याची शक्यता असते.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोविड लशीचा पहिला डोस; दिला सकारात्मक संदेश

संबंधित प्रयोगशाळा वापरत असलेल्या टेस्ट किट्सची संवेदनशिलता आणि अचूकता यावरही निदानाची अचूकता अवलंबून असते.
कोवीड-१९ साथरोगाच्या सुरूवातीच्या कालावधीत राज्यात एनआयए, पुणे ही एकमेव प्रयोगशाळा कोविड-१९ निदानासाठी कार्यरत होती.
तथापि, आता आयसीएमआर आणि एनएबीएल मानकानुसार पात्र असलेल्या प्रयोगशाळांना आयसीएमआरकडून मान्यता देण्यात येते. आज राज्यात ३७६ शासकीय आणि १४१ खाजगी अशा एकूण ५१७ प्रयोगशाळाना आयसीएमआरने मान्यता दिलेली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा- नागपुरात आठवडाभर संचारबंदी; १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाउन

[ad_2]

Source link

Leave a Comment