sanjay raut on sachin vaze transfer: सचिन वाझे यांना लक्ष्य केलं जातंय?; राऊतांनी व्यक्त केली ‘ही’ शंका – sanjay raut reaction on sachin vaze transfer

[ad_1]

हायलाइट्स:

  • सचिन वाझे यांच्या बदलीचा राज्य सरकारवर निर्णय
  • देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आक्रमक भूमिका
  • संजय राऊत यांनी उपस्थित केली शंका

मुंबईःमनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन राज्यात वातावरण तापले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव आल्यानंतर या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं आहे. अधिवेशनात या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. या पार्श्वभूमीवर अखेर सरकारनं सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपनं यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर संजय राऊत यांनी मात्र या वेळी विरोधकांवर टीका केली आहे.

मनसुख हिरन यांच्या पत्नी विमला यांनी सचिन वाझे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. वाझे यांनीच माझ्या पतीची हत्या केली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर भाजपनं विधानसभेत हा मुद्दा उचलून धरत राज्य सरकारला घेरलं आहे. तसंच, सचिन वाझे यांचं निलंबन करण्याची मागणी होत आहे. यावर राऊतांनी प्रतिक्रिया केली दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

राठोडांच्या राजीनाम्याचा निर्णय होतो मग, वाझेंना संरक्षण का?’

‘सचिन वाझे हे उत्तम तपास अधिकारी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांना हात घातला आहे. अन्वय नाईक हे दडपलेलं प्रकरण वाझेंनी उघडकीस आणलं होतं. व्हाईट कॉलर आरोपींना अटक केली. हा देखील अन्वय नाईक कुटुंबीयांसाठी न्यायच झालाच. त्याबद्दल विरोधी पक्ष बोलत नाहीत. टीआरपी घोटाळ्यातही त्यांनी कारवाई केली. सचिन वाझे यांना लक्ष्य केलं जातंय याच्यामागे त्यांनी या दोन प्रकरणाचा छडा लावला. या दोन प्रकरणात आरोपी तुरुगांत टाकले, हा एक विषय असू शकतो,’ अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली आहे.

फडणवीस आक्रमक; सरकारमधील दोन मंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल

संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘फक्त राजीनामा, बदली हेच विरोधी पक्षाचं काम आहे का? लोकशाहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने एकप्रकारे सरकारच चालवायचं असतं. तुम्हाला जर राजीनामा किंवा बदलीमध्येच समाधान मानायचं असेल, तर महाराष्ट्राचं राजकारण विरोधी पक्षांना नीट कळलेलं नाही,’ असा टोला राऊतांनी लगावला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Comment