strict restrictions in kalyan: करोना: कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढली; आजपासून कठोर निर्बंध – the administration imposed strict restrictions in kalyan and dombivli to prevent corona infection

[ad_1]

हायलाइट्स:

  • कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आज गुरुवार ११ मार्चपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
  • यामध्ये रेस्टॉरंट्स, बार, हॉटेल्स आणि दुकाने सुरू ठेवण्यासाठीच विशिष्ट वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत.
  • याबरोबरच लग्न समारंभांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठाणे: कल्याण (Kalyan) आणि डोंबिवलीमध्ये (Dombivli) करोना (corona) बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. करोना वाढीला ब्रेक लावण्यासाठी कठोर निर्णय घेत प्रशासनाने आज गुरुवार ११ मार्चपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्स, बार, हॉटेल्स आणि दुकाने सुरू ठेवण्यासाठीच विशिष्ट वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. याबरोबरच लग्न समारंभांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या करोना बाधितांना सोसायटीच्या आवाराबाहेर फिरू देऊ नये असे निर्देशही वसाहतींना देण्यात आले आहेत. (strict restrictions in kalyan and dombivli to prevent corona infection)

काल बुधवारी २४ तासांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये तब्बल ३९२ नवे करोनाबाधित सापडले. यामुळे प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण पसरले. करोनाच्या संसर्गवाढीला अटकाव कसा करायचा हा प्रश्न प्रशासनाला पडला. या क्षेत्रात ५ महिन्यांनंतर पहिल्यांदाच ३०० हून अधिक करोनाबाधित सापडले आहेत. यामुळे सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी तातडीने पोलीस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्देश दिले. कल्याणमध्ये ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशा सक्रिय रुग्णांची संख्या १२००च्या आसपास आहे. तसेच सुमारे ३०० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, अशी माहितीही सूर्यवंशी यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; चर्चेला उधाण

असे आहेत कठोर निर्बध!

> मास्क वापरणे बंधनकारक. अन्यथा कारवाई.
> दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरू राहतील.
> अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांना यातून वगळण्यात आले आहे.
> शनिवार आणि रविवारी पी-१ आणि पी-२ या व्यवस्थेनुसार दुकाने सुरू राहतील.
> भाजीमंडया ५० टक्के क्षमतेने चालवल्या जातील.
> आठवडी बाजारांवरांनाही काही नियम पाळणे बंधनकारक असेल.
> खाद्यपदार्थ आणि पेयांच्या गाड्यांना संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी.
> लग्न आणि हळदी समारंभांमध्ये ५० लोकांनाच परवानगी. अशा समारंभांसाठी देखील सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
> अशा कार्यक्रमांत नियमांचे उल्लंघन झाल्यास वधू-वराच्या आई-वडिलांविरोधात, तसेच मंगल कार्यालयांविरोधात गुन्हे दाखल केले जातील.
> बार आणि हॉटेल्ससाठी रात्री ११ ऐवजी ९ वाजेपर्यंतचीच वेळ देण्यात आली आहे.
> होम डिलिव्हरीसाठी रात्री १० वाजेपर्यंत मुभा असणार आहे.
> पोळी-भाजी केंद्रे रात्री ९ पर्यंतच सुरू राहतील.
> महाशिवरात्रीसाठी कल्याण-डोंबिवलीमध्ये असलेली ६२ मंदिरे फक्त पूजा करण्यासाठी उघडण्यात येतील, दर्शनासाठी मात्र मंदिरे बंदच ठेवण्यात येणार आहेत.
> होम आयसोलेशनमध्ये असलेले करोना बाधित फिरताना आढळल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई होणार.
> होम आयसोलेशनसाठी घरात जागा असणाऱ्यांनाच होम आयसोलेशनी परवानगी मिळणार.

क्लिक करा आणि वाचा- सोलापूर: नवनिर्वाचित सरपंचाला बेदम मारहाण, ‘हे’ कारण
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सचिन वाझेंचे वकील वाटतात: फडणवीस

[ad_2]

Source link

Leave a Comment